कर्म. रा. स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था,

राजारामनगर, पो. मातेरेवाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक ४२२२०९                             * कार्यकारी संचालक मंडळ  *

अ. न

विश्वस्ताचे नाव 

पद

१)       

मा.श्री. शहाजी माणिकराव सोमवंशी

अध्यक्ष

२)       

मा.श्री. सुभाषराव माधवराव  शिंदे

उपाध्यक्ष

३)       

मा.श्री. शिवाजीराव पंडितराव बस्ते

सदस्य

४)       

मा.श्री.बाळकृष्ण पोपटराव जाधव

सदस्य

५)       

मा.श्री. दिनकर मुरलीधर जाधव

सदस्य

६)       

मा.श्री. मधुकर संपतराव गटकळ

सदस्य

७)       

मा.श्री. विश्वनाथ सुदामराव देशमुख

सदस्य

८)       

मा.श्री. बापुराव शिवराम पडोळ

सदस्य

९)       

मा.श्री. सुखदेव दशरथ जाधव

सदस्य

१०)   

मा. श्री सुनील रघुनाथ केदार

सदस्य

११)   

मा. श्री. दादासाहेब नथू पाटील

सदस्य

१२)   

मा. श्री. अमोल उत्तमराव भालेराव

सदस्य

१३)   

मा. श्री. राजेंद्र देविदास गांगुर्डे

सदस्य

१४)   

मा. सौ चंद्रकला नामदेव घडवजे

सदस्या

१५)   

मा. सौ शांताबाई रामदास पिंगळ

सदस्या

१६)   

श्री. बाळासाहेब पंढरीनाथ उगले

सचिव

          कर्म. रा. स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था,

राजारामनगर, पो. मातेरेवाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक ४२२२०९

                                                                  * शाखा विस्तार*

१) कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, राजारामनगर (मातेरेवाडी), ता. दिंडोरी २) कादवा तंत्रनिकेतन, राजारामनगर (मातेरेवाडी) जि. नाशिक. ३) बी. के. कावळे माध्य.व उच्च माध्य. विद्यालय, राजारामनगर (मातेरेवाडी), ता. दिंडोरी ४) कादवा इंग्लिश स्कुल, लखमापूर, ता. दिंडोरी. ५) रा. स. वाघ माध्यमिक विद्यालय, सोनजांब, ता. दिंडोरी ६) माध्यमिक विद्यालय, अवनखेड, ता. दिंडोरी, जि. नाशिक. ७) प्राथमिक विद्यामंदिर, राजारामनगर (मातेरेवाडी), ता. दिंडोरी ८) प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, भनवड, ता. दिंडोरी, जि. नाशिक. कर्म रा. रा.वाघ संस्था, स्कुल ऑफ नातंग राजारामनगर ९) कर्म. रा. स. वाघ संस्था,स्कुल ऑफ नर्सिंग, राजारामनगर (मातेरेवाडी), ता. दिंडोरी १०) कादवा इंग्लिश मिडीयम, राजारामनगर (मातेरेवाडी). ता. दिंडोरी

कर्म. रा. स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजारामनगर ता. दिंडोरी, जि. नाशिक – ४२२२०९ माहिती पत्रक २०२३ -२०२४ महाविद्यालयासंबंधी माहिती :-

जून २००८ मध्ये स्थापन झालेल्या आमच्या महाविद्यालयाचे चालू वर्षी दहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. महाविद्यालयाने आदिवासी विभागात शिक्षणाचे नवे द्वार उघडले असून ग्रामीण व आदिवासी भागात शिक्षणाचा गुणात्मक आदर्श निर्माण केला आहे व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी शासकीय व निमशासकीय अशा विविध पदांवर कार्यरत झाले आहे.

                                          -: महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये :-

नवीन इमारत :- कादवा साखर कारखान्याजवळ, दिंडोरी-पिंपळगांव रस्त्यावर महाविद्यालयाची नवीन, भव्य व आकर्षक इमारत तयार झालेली आहे. हवेशीर व निवांत वातावरण ही या परिसराची वैशिष्ट्ये, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि वाचन कक्षांची सोय आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी व स्वतंत्र स्वच्छता गृहाची सोय आहे. अध्यापनासाठी स्वतंत्र वर्ग, विज्ञान शाखेसाठी प्रत्येक विषयाची स्वतंत्र प्रयोगशाळा तसेच संगणक कक्ष इ. इंटरनेट सुविधांची सोय इमारतीत करण्यात आलेली आहे.

विविध सोयी :-  महाविद्यालयात संगणक प्रशिक्षणाची पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजना अंतर्गत शिष्यवृत्तींची लेक्चर, सेमीनार आदींची सुविधा महाविद्यालयाने केलेली आहे.

प्राध्यापक वर्ग :- महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रात अनुभव असलेला, आपापल्या विषयात तज्ञ व विद्यार्थ्यांबद्दल कळकळ बाळगणारा असा उत्साही आणि कार्यक्षम प्राध्यापक वर्ग कॉलेजला लाभला आहे. विद्यापीठ नियमानुसार NET/SET/Ph.D. असलेल्या प्राध्यापकांची संख्या वाढवलेली आहे, तसेच विषयतज्ञ गेस्ट लेक्चररची सुविधा गरजेनुसार केली जाते.

समृध्द ग्रंथालय आणि अभ्यासिका :- ग्रंथालय हा शैक्षणिक संस्थेवा अत्यंत महत्वाचा भाग या जाणीवेने महाविद्यायाचे ग्रंथालय सर्व विषयांची पाठपुस्तके व संदर्भ ग्रंथ यांनी समृध्द असे आहे. ग्रंथालयात चार हजाराच्या दरम्यान ग्रंथ आहेत. ग्रंथालयात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सोय करण्यात आली असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक ती क्रमिक पुस्तके मिळू शकतात. विद्यार्थिनींसाठी ग्रंथालयाची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे.

पुस्तक पेढी :- विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके सहाय्य करण्यासाठी पुस्तक पेटी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना या पेढीतून वर्षभर वापरण्यासाठी पुस्तके मिळू शकतात. अशी पुस्तके मिळवण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांनी योग्य वेळी अर्ज करावा.

कलागुणांना वाव :- विद्यार्थ्यांच्या साहित्यिक आणि इतर कलागुणांना व्यापक संधी देण्यासाठी वादविवाद कलामंडळ, भित्तीपत्रक इ. उपक्रमही चालू आहेत. सांस्कृतिक विभागामार्फत निरनिराळधा स्पर्धा व उपक्रमामार्फत विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जातात. तसेच विज्ञान विभागाअंतर्गत, केमवाड, वातावरण जनजागृती,औषधी वनस्पतींची लागवड ,१०० मी मॅरेथॉन,इत्यादी कार्यक्रमांची अमलबजावणी केली जाते .

वार्षिक स्नेहसंमेलन :-          महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यासंबंधीचा अंतिम अधिकार मा. प्राचार्यांना राहील. विद्यार्थ्यांकडून वार्षिक स्नेहसंमेलनाबाबत कोणतीही सुचना विचारात घेतली जाणार नाही. विद्यापीठ नियमानुसार स्नेहसंमेलन नियोजित वेळेत आयोजित केले जाते.

शारीरिक शिक्षण :-       विद्यार्थ्यांच्या बौध्दीक विकासाबरोबर त्यांच्या शारीरिक विकासाकडे ही लक्ष देण्यात येते. विद्यार्थ्यांसाठी खास देशी-विदेशी खेळांची सोय करण्यात आली आहे. युवा सप्ताहांतर्गत विविध क्रीडा स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. यासाठी महाविद्यालयाने विद्यापीठ मान्यताप्राप्त फिजिकल डायरेक्टरची निवड केली आहे. विद्याथ्र्यांच्या प्रथमवर्ष B.AJ B.Com./B.Sc. विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती (Physical Fitness) चाचण्या करुन घेतल्या जातात.

राष्ट्रीय सेवा योजना :- महाविद्यालयात पुणे विद्यापीठ पुरस्कृत विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचा (एन.एस.एस.) चा उपक्रम चालू असून समाजसेवेची व शारीरिक कष्टाची आवड असणाऱ्या विद्याथ्र्यांना या योजनेत सहभागी होता येते. राष्ट्रीय योजनेत प्रौढ साक्षरता उपक्रमातही विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. त्यात दरवर्षी ७ दिवसांचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर बाहेरगावी आयोजित करण्यात येते. यात वृक्षारोपण, पर्यावरण संगोपन, ग्लोबल वॉर्मिंग, रेगिंग प्रतिबंध, समाज परिवर्तन, बौध्दिक विकास, स्वच्छता निवारण अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

व्याख्यानमाला :-       महाविद्यालयात बह्री:शाला व्याख्यानमाले अंतर्गत तज्ञ व्याख्यात्यांची वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन व्याख्याने आयोजित केली जातात. तसेच डी. जयकर व्याख्यान मालेतील सलग तीन व्याख्याने आयोजित केली जातात.

विद्यार्थी कल्याण मंडळ  

१) कमवा व शिका :- गरजू व होतकरु विद्यार्थ्यास काम करुन आपले शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध व्हावी या दृष्टीने या महाविद्यालयात कमवा व शिका ही योजना राबविली जाते. या योजनेमुळे गरीब व होतकरु विद्यार्थ्यास फी, परीक्षा फी, अॅडमिशन फी, प्रवास खर्च इ खर्च भागविता येतो.

२) विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास योजना :- विद्यार्थिनींना शिक्षणेत्तर उपक्रमात मोकळेपणाने सहभागी होण्यास प्रवृत्त करुन त्यांचा व्यक्तिमत्व विकास साधता यावा यासाठी महाविद्यालयात विद्यार्थिनी व्यक्मित्व विकास योजना राबविली जाते. (सॉफ्ट स्किल डेव्हलपेंट प्रोग्राम) यासाठी तज्ञांची (महिला) शिबीरे घेतली जातात.

३) निर्भय कन्या :- महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाडीचे प्रकरण व प्रदूषित सामाजिक पर्यावरणाचा परिणाम स्त्री शिक्षणावर होतो. मुली मोकळेपणाने सहभागी होत नाहीत. अशा मुलींना अत्याचाराविरुध्द तोंड देण्यास सबळ करण्यासाठी त्यांचे संरक्षणार्थ निर्भय कन्या अभियान महाविद्यालयात राबविले जाते व सुरक्षात्मक किंवा स्व:रक्षणात्मक कौशल्ये शिकविली जातात. (मार्शल आर्ट, ज्युदो इ.) तसेच

Sexual Harassment बाबत अभियान राबवून संरक्षणात्मक काळजी घेतली जाते. महाविद्यालय नॅक मुल्याकन कामकाज सुरु आहे

महाविद्यालयीन वर्ष :- सन २०२३ -२०२४ शैक्षणिक वर्ष १५ जून २०२३ पासून सुरू होईल आणि ३० एप्रिल २०२४ रोजी संपेल शैक्षणिक वर्ष दोन सत्रात विभागलेले आहे. महाविद्यालयीन वेळ :- महाविद्यालयीन वेळ: सकाळ सत्र ७.३० ते १२.०० वा. व दुपार सत्र : १२.०० ते ४.०० वा. पर्यंत राहील. (विज्ञान विभाग) या वेळेत सोयीनुसार बदल करण्यात येईल.

कार्यालयीन कामाकाजाची :- सकाळी ९.३० ते सायं. ४ पर्यंत राहील. (विद्यार्थीसाठी)  २०२३ -२०२४ या शैक्षणिक वर्षात दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची रुपरेषा :- चालू शैक्षणिक वर्षामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार पुढील वर्गाचे अभ्यासक्रम आमच्या महाविद्यालयात शिकविण्यात येतील.

कला :- १) एफ. वाय. बी. ए., २) एस. वाय. बी. ए., ३) टी. वाय. बी. ए.

वाणिज्य :- १) एफ. वाय. बी. कॉम. २) एस. वाय. बी. कॉम. ३) टी. वाय. बी. कॉम

विज्ञान :- १) एफ. वाय. बी. एस्सी., २) एस. वाय. बी. एस्सी., ३) टी. वाय. बी.एस्सी. फक्त S.Y./B.A./B.Com. / B.Sc या वर्गासाठी Environmental Awareness हा विषय अनिवार्य राहील.  

प्रवेश मर्यादीत :- विद्यापीठाच्या परिपत्रकाप्रमाणे प्रत्येक तुकडीत १२० विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावयाचा असल्याने सर्व पदवी वर्गात प्रवेश मर्यादीत आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.                                                                 

  कला शाखा (Three Years integrated B.A. Degree Course)

कला शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला प्रत्येक वर्षी ६ विषय आणि द्वितीय वर्गात अधिक एक या प्रमाणे ३ वर्षात १९ पेपर्सचा अभ्यास करावा लागेल. पहिल्या वर्षी निवडलेल्या विषयांचा संबंध तिन्ही वर्षासाठी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आरंभीच्या विषयांची निवड काळजीपूर्वक करावी की जेणे करून Special विषय निवडताना अडचण भासणार नाही यानुसार विषयांची निवड वैयक्तिक अंदाज घेऊन करावी.

  • बी.ए. परीक्षेसाठी विविध विषय एफ. वाय. बी. ए. प्रथम वर्ष बी. ए. परीक्षेसाठी या महाविद्यालयात शिकविले जाणारे विषय खालीलप्रमाणे :-

  • इंग्रजी (Compulsory). २)  मराठी

  • ३) अर्थशास्त्र                                                                        ४)  राज्यशास्त्र ५) भूगोल                                                                            ६)  इतिहास ७) समाजशास्त्र                                                                    ८)  ऑप्शनल इंग्रजी एस. वाय. बी. ए. अनिवार्य इंग्लिश (Compulsory English) या शिवाय एफ. वाय. बी. ए. मध्ये घेतलेल्या विषयांपैकी तीन जनरल, निवडलेल्या तीन जनरलपैकी एक स्पेशल व पर्यावरण जाणीव जागृती असे एकूण पाच विषय घ्यावे लागतील. स्पेशल विषयाचे दोन पेपर्स असतील असे एकूण ७ पेपर्स असतील. पर्यावरण विषय सोडून ६०० मार्काची परीक्षा होते. पर्यावरणसाठी श्रेणी दिल्या जातात. ७५ मार्क लेखी व २५ मार्क प्रोजेक्ट या मार्काचे रुपांतर श्रेणीत केले जाते. बी.ए. स्पेशलसाठी महाविद्यालयात खालील विषयांची सोय आहे. १) इंग्रजी, २) मराठी, ३) अर्थशास्त्र, ४) राज्यशास्त्र टि. वाय. बी. ए. अनिवार्य इंग्लिश (Compulsory English) व एस.वाय.बी.ए. मध्ये घेतलेले सर्व विषय पुढे चालू ठेवावे लागतात. टी.वाय.बी.ए.साठी ६०० मार्कांची परीक्षा घेतली जाते. टिप : विद्यापीठाने सुरु केलेल्या सर्व उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांने सक्रिय सहभाग नोंदविणे अनिवार्य आहे.  

  •                                                        वाणिज्य शाखा (थ्री-इअर इंटिलेटेड बी.कॉम, डीग्री कोर्स, नवीन पुर्नरचित सीबीसीए अभ्यासक्रम) वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांला पहिल्या वर्षी (एफ.वाय.बी. कॉम.) सहा पेपर्स व एक भाषा पेपर, दुसऱ्या वर्षी (एस.वाय.बी.कॉम.) सात पेपर्स आणि तिसन्या वर्षी (टी.वाय.बी.कॉम.) सहा पेपर्स असा एकूण २० पेपर्सचा अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास पुढील प्रमाणे राहील. F.Y.B.Com.

  1. A) Compulsory Group (4 Papers)

1) Functional English, 2) Financial Accounting 3) Business Economics 4) Mathematics & Statistics

  1. B) Optional Group (2 Papers)

1) Organisation skill & Development. 2) Marketing and Salesmanship Additional Group (1 Paper)

  1. C) 1) Marathi

S.Y.B.Com.

  1. A) Compulsory Group

1) Business Communication 2) Corporate Accounting 3) Business Economics (Macro ) 4) Principle & Functional of Management 5) Corporate Law 6) Environmental Awareness

  1. B) Special Group

1) Business Administration     T.Y.B.Com.

  1. A) Compulsory Group

1) Business Regulatory Framework (M.Law) 2) Advanced Accounting 3) International Economics 4) Auditing and Taxation

  1. B) Special Group

1) Business Administration Paper-II 2) Business Administration Paper-III SCIENCE Three Year B.Sc. Degree Course

  1. A) F.Y. B.Sc.

Every Student has to choose four science subjects for F.Y.B.Sc. from the following subjects. 1) Mathematics, 2) Physics, 3) Chemistry, 4) Botany, 5) Zoology

  1. B.: There will be 2 Theory courses and 1 Practical course for each subject students have to choose one of the following groups.

Group-A 1) Chemistry, 2) Physics, 3) Mathematics, 4) Botany Group-B 1) Chemistry, 2) Physics, 3) Botany, 4) Zoology

  1. B) S.Y. B.Sc.

Students will have to choose three science subjects for S.Y.B.Sc. out of the four offered at the F.Y.B.Sc. In addition, there will be one paper in Marathi & Environmental Awareness at the S.Y.B.Sc N.B.: There will be two Theory courses & one practical course for each science subject except in Mathematics where there will be one additional Theory paper in lieu of each practical courses.

  1. C) T. Y. B.Sc.

Chemistry. (Special Subjects) N.B.: There will be six theory courses and three practical’s courses. For each science subject while going form S.Y.B.Sc. to T. Y. B.Sc.  सूचना: पुणे विद्यापीठाने ऐनवेळी सामाजिक जाणीवेसाठी एखादा विषय जर नव्याने समाविष्ट केला तर तो विद्यार्थ्यास घेणे अनिवार्य असेल याची नोंद घ्यावी. प्रवेश अर्ज :- १) प्रवेश अर्ज घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या माहितीपत्रकासोबत दिलेले प्रवेश अर्ज भरुन शक्यतो मुदतीचे आत नावे दाखल करावीत. २)  सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या क्षेत्रातील इतर कॉलेजमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्वीच्या कॉलेजकडून ट्रान्सस्फरन्स सर्टिफिकेटस्, कॅरेक्टर सर्टिफिकेटस् मिळावयास हवीत. अर्ज करावा. ३) पुणे विद्यापीठाखेरीज इतर विद्यापीठांतून (महाराष्ट्राबाहेरील शिक्षण मंडळाकडून) येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठाकडून (महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून) आपला प्रवेश पात्रतेचा दाखला (इलेंब्लीजीटी सर्टिफिकेट) मिळविलेले असणे आवश्यक आहे. त्या अर्जा सोबत पुढील दाखले व त्यांच्या टाईप व ॲटेस्टेड केलेल्या दोन प्रती जोडलेल्या असणे आवश्यक आहे. १) विद्यापीठ स्थलांतर दाखला (Migration Certificate) योग्यता प्रमाणपत्र २) कॉलेज स्थलांतर दाखला (Transfer Certificate) शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate) ३) आवश्यक गुणपत्रक (Statement of Marks ) ४) उत्तीर्ण झाल्याचा दाखला (Passing Certificate) ५) वर्तणुकीचा दाखला (Character Certificate) ६) रैगिंग संदर्भात (विद्यार्थी व पालक) यांचे हमीपत्र वरील प्रकारची प्रमाणपत्रे दाखल होईपावेतो दिला जाणारा प्रवेश तात्पुरता समजावयाचा आहे. जरुर ती सर्टिफिकेटस् दाखल केल्यानंतर प्रवेश कायम समजण्यात येईल. ही सर्टिफिकेटस् जर पहिली टर्म संपण्यापूर्वी दाखल केली नाही तर ह्या कॉलेजमध्ये भरलेली टर्म नामंजूर करण्यात येईल व नंतर कॉलेजमधून नाव कमी करण्यात येईल. तसेच कॉलेजातून नाव कमी करावयाचे असल्यास कार्यालयाकडे तसे लेखी कळवावे. तसे न केल्यास नाव कमी केले जाणार नाही व अशा विद्यार्थ्यांकडून संपूर्ण वर्षाची फी वसूल केली जाईल. मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी तहसिलदार यांच्या सहीचा जातीचा दाखला काढल्यानंतरच प्रवेश घ्यावा.

टिप :- प्रवेश घेतेवेळी १२ वी नंतर विद्यार्थ्यांचा गॅप गेला असेल, तर त्याने गॅप सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे.  

विविध सवलती व शिष्यवृत्या (सविस्तर माहिती यात मिळेल) १) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. २) पुणे विद्यापीठ आर्थिक दुबल घटक शिष्यवृत्ती. ३) पुणे विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती. ४) राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती

  • ई.बी.सी. कन्सेशन :- ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न १५०००रु. पेक्षा कमी आहे. अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारची फी (ई.बी.सी.) सवलत मिळू शकेल. कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला त्यासाठी महाविद्यालयामार्फत ठराविक मुदतीत विशिष्ट फॉर्ममध्ये अर्ज करावा लागेल.

  1. गहनेंट ऑफ इंडिया बी. सी. स्कॉलरशीप मागासलेले वर्ग, वर्गीकृत जाती जमाती – यामधील विद्याथ्र्यांना केंद्र सरकारकडून शिष्यवृत्ती मिळते. अशा विद्यार्थ्याला महाविद्यालयाची फी सरकारकडून मिळते.

  2. महाविद्यालयामार्फत मिळणारी फी माफी विविध परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे शिष्यवृत्या दिल्या जातात. तसेच गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना विद्यार्थी सहाय्य निधीतून सहाय्य दिले जाईल. विद्यार्थ्यांची उपस्थिती, वर्तणूक, अभ्यासातील प्रगती आणि गरजेची तीव्रता या गोष्टीचा विचार करून अशी मदत दिली जाईल. वर दिलेल्या तसेच अन्य शिष्यवृत्या आणि सवलती या संबंधीच्या सूचना वेळोवेळी महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात येतील. विद्याथ्र्याने अशा सूचना काळजीपूर्वक वाचून दिलेल्या मुदतीत तत्संबंधी पूर्तता करावी.त्यासाठी विद्यार्थ्यांनी सूचना फलक वाचण्याची काळजी घ्यावी.

  3. विद्यार्थ्याचे वर्तन व शिस्ती संबंधीचे नियम : १) विद्यार्थ्याचे महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर त्याला महाविद्यालयाचे शिस्त विषयक सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. २) विद्यार्थ्याचे महाविद्यालयाने ठरवून दिलेला गणवेश परिधान करणे अनिवार्य आहे. ३) विद्यार्थ्याने  दरवर्षी महाविद्यालयात विहीत प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेणे बंधनकारक आहे. ४) ओपन प्रवर्गासाठी सुरुवातीला कमीत कमी ५०% प्रवेश फी रक्कम भरणे आवश्यक आहे. ४) प्रथम वर्षात प्रवेश घेतल्यानंतर सदर वर्षातील असेल तर पुढील प्रवेश जाईल ५)  एकदा भरलेली कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही. भरल्याबरोबर पावती घ्यावी. विहीत मुदतीत प्रवेश केल्यास विद्यापीठ नियमाप्रमाणे फी मिळेल. ६) विद्यार्थ्यांची सरासरी उपस्थिती ८५% पेक्षा अधिक असणे अनिवार्य आहे. ७) स्वाध्याय, अंतर्गत चाचण्या परीक्षांना उपस्थित राहणे अनिवार्य आहे. ८)

  4. ओळखपत्र:- महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचे ओळखपत्र बनवून अनिवार्य आहे. ओळखपत्रासाठी नव्याने काढलेला फोटो असावा. सदर ओळखपत्र महाविद्यालयाच्या आवारात कायम जवळ बाळगणे बंधनकारक आहे. प्राचार्य,प्राध्यापक प्रशासकीय सेवक यांनी मागणी करताच कोणतीही सबब सांगता ओळखपत्र दाखविणे बंधनकारक आहे. ९) वर्ग असतांना वर्गात बसणे, अयोग्य वर्तन करणे, महाविद्यालयाच्या मालमतेचे नुकसान करणे, महाविद्यालयाच्या आवारात रेडिओ, कॅमेरा, मोबाईल फोन वापरणे, आपल्या सोबत महाविद्यालयाशी संबंध नसलेल्या बाहेरील विद्याथ्यांना/व्यक्तींना बरोबर आणणे बाबी गैरवर्तन समजून सदर विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातील प्रवेश रद्द करण्यात येईल. १०) विद्याथ्र्यांनी आपली वाहने विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वाहनतळावरच लावणे बंधनकारक आहे. ११) पालकांऐवजी अन्य कोणाला महाविद्यालयात बरोबर आणणे गैरवर्तन समजण्यात येईल. १२) महाविद्यालयात परिसरात धुम्रपान करणे निषिध्द असून घुम्रपान करणाऱ्या विद्यार्थ्यांवर महाराष्ट्र शासनाच्या धुम्रपान प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. १३) माननीय सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशान्वये रॅगिंग प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असून त्याप्रमाणे सहस्वाध्यायी विद्यार्थी-विद्यार्थिनींना शारीरिक, मानसिक त्रास देणे, अपमानित करणे, हिनविणे, व्यंगावर टिका करणे, मना विरुध्द चेष्टा मस्करी करणे बाबीत दोषी आढळून आल्यास पोलीस कारवाई करण्यात येईल प्रतिबंधक म्हणून महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक पथक कार्यरत आहे. प्रवेश अर्जासोबत रॅगिंग संदर्भात हमीपत्र सादर करणे बंधनकारक आहे. १४) विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन न केल्यास त्यांच्यावर खालील प्रमाणे शिस्तभंग कारवाई करण्यात येईल. १) प्रवेश रद्द करण्यात येईल. २) सत्र रद्द करण्यात येईल. ३) परीक्षा अर्ज भरण्यास प्रतिबंध करण्यात येईल. ४) परीक्षा निकाल राखीव ठेवण्यात येईल. ५) महाविद्यालयातून निलंबन करण्यात येईल. ६) परीक्षेस प्रतिबंध करण्यात येइल.

  5. टिप :- १) या व्यतिरिक्त शासन निर्णयानुसार फी वाढ झाल्यास वाढीव फी भरावी लागेल. (अनिवार्य) २) एस.वाय.बी.ए., बी. कॉम व बी.एस्सी. साठी पर्यावरण शिक्षणसाठी रु. २००/- फी विद्यापीठ नियमानुसार जादा भरावी लागेल. (अनिवार्य) प्राचार्य कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजारामनगर ता. दिंडोरी, जि. नाशिक. स्थळ : राजाराम नगर, मातेरेवाडी, कादवा स.सा.का. दिनांक १ जून २०२३                               * विद्यार्थ्यांच्या वर्तनासंबंधी नियम *

  6. १) विद्यार्थ्यांनी आपापल्या तासांना वक्तशीरपणे हजर असले पाहिजे. परवानगी शिवाय असणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्तन बेशिस्त मानले जाईल व सातत्याने गैरहजर राहिल्यास त्याचे नाव पटावरुन कमी करण्यात येईल. २) महाविद्यालयात घेतल्या जाणाऱ्या एन. एस. एस. तास व पी. टी. परेड्ना हजर राहणे आवश्यक आहे. नियमितपणे हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच विद्या पाले ३) महाविद्यालयात होणाऱ्या सर्व परीक्षांना बसून प्रत्येक परीक्षेत विद्यार्थ्यांनि समाधानकारक प्रगती दाखविली पाहिजे. ४) प्राध्यापकांशी वागतांना विद्यार्थ्यांचे वर्तन विनयशील असावे. महाविद्यालयातील इतर सेवक वर्गाशी यागतांना सभ्यतेच्या मर्यादा पाळणे आवश्यक आहे. ५) महाविद्यालयाच्या आवारात व बाहेरही विद्यार्थ्यांनी शिस्त, सौजन्य व संयम राखून वर्तन करावे. ६) महाविद्यालयाच्या स्थावर जंगम मालमतेस कोणत्याही तऱ्हेचे नुकसान पोहचेल व विद्रुपता – येईल असे वर्तन केल्यास अशा विद्यार्थ्यांस कडक शासन केले जाईल व त्याचप्रमाणे दंडाची आकारणी केली जाईल. ७) प्रत्येक विद्यार्थ्याला महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर ओळखपत्र (आयडेंटी कार्ड) दिले जाईल. त्यावर विद्यार्थ्यांने आपला फोटो चिकटवून प्राचार्यांची सही घ्यावी. ओळखपत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्यांस महाविद्यालयाच्या आवारात, वर्गात, ग्रंथालयात किंवा सभा-समारंभास प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या फोटोची एक प्रत महाविद्यालयाच्या दप्तरी राहील. ८) महाविद्यालयात प्रकारची संस्था किंवा मंडळ स्थापन करण्यास किंवा कोणताही कार्यक्रम घडवून आणण्यास प्राचार्यांची पूर्व संमती घेतली जाणे आवश्यक आहे. ९) सूचना फलकावर वेळोवेळी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सूचना वाचण्याची प्रत्येक विद्याध्यनि दक्षता घ्यावी आणि सूचना लक्षात घेऊन ह्यांची वेळीच कार्यवाही करावी. कार्यवाही न केल्यास त्यास संबंधित विद्यार्थी जबाबदार राहील. १०) १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी महाविद्यालयात हजर राहणे सक्तीचे आहे. ११) दाखला व इतर कागदपत्रे सांभाळून ठेवावीत. १२) मुळ दाखला परत मिळणार नाही. १३) महविद्यालयात मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे. १४) T.C. साठी अर्ज केलेल्या तारखेपासून सात दिनी T.C. निळेल. T.C. क्रि नाही याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्या.